कोल्हापुर येथे कोळासुराचे राज्य‌ होते.त्याने क‌रवीर न‌गराच्या रक्ष‌णासाठी चारी दिशांनी चार ब‌लाढ्य‌ राक्ष‌स‌ ठेव‌ले होते.दक्षिण‌ दिशेला अस‌लेला रक्त‌बीज‌ हा राक्ष‌स‌ लोकांना छ‌ळे. त्याच्या पाडावासाठी श्री. म‌हाल‌क्ष्मीने श्री. भैरवांना पाठविले. श्री. भैरवाने रक्त‌बीजाशी घ‌न‌घोर युध्द‌ केले. परंतु  रक्त‌बीजाच्या रक्ताच्या थेंबातून‌ असंख्य‌ राक्ष‌सांची निर्मीती होवू लाग‌ली. हे पाहुन‌ श्री भैरवाने  कात्याय‌नी देवीचा धावा घेत‌ला.ती प्रग‌ट‌ झाली तिने रक्त‌बिजाचा व‌ध‌ केला.

त‌सेच‌ म‌हाल‌क्ष्मीने आप‌ल्या न‌ग‌राच्या पुर्व‌ बाजुचे रक्ष‌ण‌ क‌रण्यासाठी श्री. उज्ज‌व‌लांबा देवीची नियुक्ती केली.ही उज्ज‌व‌लांबा अत्यंत‌ उग्र रुप‌ धारण‌ क‌रणारी होती. तिचे वास्त‌व्य‌ पुर्वेच्या पठाराव‌र होते. तेथे तिने आप‌ल्या सैनिकांच्या निवासासाठी गुहा खोद‌ल्या. त्रिशुलाने पर्व‌ताचा भेद‌ केला त्यातुन‌ वारणा या नावाच्या न‌दीचा उग‌म‌ झाला. आप‌ल्या पिण्याच्या पाण्यासाठी एक‌ झ‌रा खोद‌ला. या प‌र्व‌ताच्या शिलाखंडाखाली श्री. उज्ज‌व‌लांबा देवी जाग‌त्या पाहा-याखाली निवास‌ करीत असे. ती अत्यंत शुर होती. कोळासूराचा दुस‌रा मुल‌गा रक्त‌कोळ‌ हा लोकांना छ‌ळत‌ असे. त्याचा पाडाव‌ क‌रण्यासाठी श्री. उज्ज‌व‌लांबा देवीने श‌स्त्र हाती घेत‌ले. रक्त‌कोळ‌ राक्ष‌साशी घ‌न‌घोर युध्द‌ केले. रक्त‌कोळ‌ राक्ष‌साचा व‌ध‌ झाला.

आप‌ल्या द्विय‌ श‌क्तिने उज्ज‌व‌लांबेने निर्माण‌ केले एक‌ तीर्थ‌कुंड आहे.त्या कुंडाला उज्ज‌व‌ल‌ तीर्थ‌ म्ह‌ण‌तात‌.या तीर्थाचे  पाणी पाप‌क्षाल‌न‌ क‌रणारे आहे.त्यासंबंधाची लोक‌क‌था अशी आहे. एक‌दा अग‌स्ती ऋषी आप‌ली प‌त्नी लोपामुद्रा स‌म‌वेत‌ तीर्थारन‌ क‌रीत‌ आस‌ता या क्षेत्री आले. त्यावेळी  लोपामुद्रेने या तीर्थाविष‌यी म‌ह‌ती अग‌स्ती ऋषींना विचारली त्यांनी सांगीत‌ले, "पुर्वी एका माण‌साने पंच‌ म‌हापात‌के केली होती. नंतर त्याला अप‌ल्या या कर्माचा प‌श्चाताप‌ झाला. तेव्हा त्याने आप‌ण‌ कोण‌त्या मार्गाने या पापातुन‌ मुक्त‌ होऊ असा प्रश्न‌ अग‌स्ती मुनींना केला, तेव्हां त्यांनी त्याला सांगीत‌ले कि तु उज‌व्या हातात‌ काळे तीळ‌ घेवून‌ करवीर क्षेत्रातील‌ उज्ज‌व‌ल‌ तीर्थ‌ स्नान‌ कर व‌ ज्यावेळी तुझ्या हातातील‌ काळे तीळ‌ पांढ‌रे होतील‌ त्यावेळी तु या म‌हापापापासुन‌ मुक्त‌ झालास‌ असे स‌म‌ज‌.

अग‌स्ती मुनींनी सांगीत‌ल्याप्रमाणे तो माणुस‌ या क्षेत्री आला . उज‌व्या हातात‌ काळे तीळ‌ घेवुन‌ या तीर्थ‌कुंडात‌ स्नान‌ केले. स्नान‌ केल्यानंत‌र उज्ज‌व‌लांबबेचे द‌र्श‌न‌ घेतेले व‌ त्याने मुठ‌ उघ‌डुन‌ पाहिली. तर कालळे तिळ‌ पांढ‌रे झाले होते. त्या माण‌साची म‌हापात‌कातुन‌  मुक्त‌ता झाली होती.त्याला खुप‌ आनंद‌ झाला. पापातुन‌ मुक्त‌ता करणारे तीर्थ‌ म्ह‌णुन‌ उज्ज‌व‌ल‌ तीर्थ‌ असे  या तीर्थ‌कुंडाला म्ह‌ण‌तात‌.

उज्ज‌व‌लांबेला उज‌ळाईदेवी असे म्ह‌ण‌तात‌. ही देवी येथे निसरगात‌ अशा पंध‌रा फुट‌ पुढे आलेल्या व‌ बारा फुट जाड‌ आस‌लेला व‌ न‌ऊ फुट रूंद‌ आस‌लेला प्रचंड‌ शिलाखंडाखाली प्रस्थापित‌  खंझाली आहे. तिथे  डाव्या बाजूला उज्ज‌व‌ल‌ तीर्थ‌ आहे. हे तिर्थ‌ कुंड‌ छोटेसे आहे.  प‌ण‌ आखंड‌ असा जीवंत‌ झ‌रा आहे. त्याचे पाणी क‌धीही अट‌त‌ नाही. उज‌व्या बाजूला खोद‌लेल्या गुहा आहेत‌.पाव‌साल्यात‌ सुंद‌र आशा ध‌ब‌ध‌ब्याखाली पाणी कोस‌ळत‌ आस‌ते. उज‌ळाईदेवीच्या नावानेच‌ इथ‌ल्या  छोट्याशा गावाला  उज‌ळाईवाडी म्ह‌ट‌ले जाते.